आध्यात्मिक स्टेटस मराठी/ Spiritual Status In Marathi/ Spiritual Quotes In Marathi

Spiritual Status In Marathi/  आध्यात्मिक स्टेटस मराठी

Spiritual Status In Marathi
Spiritual status in marathi

Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी आध्यात्मिक स्टेटस घेऊन आले आहे.

या पोस्टमधे आध्यात्मिक स्टेटस मराठी,Spiritual Status In Marathi, Spiritual Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.

Spiritual Status In Marathi/  आध्यात्मिक स्टेटस मराठी

Spiritual quotes in marathi
Spiritual quotes in marathi

"जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा

 वाचनालयात जातील तेव्हा

 भारत जगात महासत्ता बनेल"

_____________________________________________

"श्रद्धेची मुळे हृदयात असतात, 

जिभेच्या टोकावर नसतात"

_____________________________________________

"मी देव मानतो पण

 माणसात राहणारा" 

_____________________________________________

"पाण्याला बंध घातला तर ते "संथ" होते, 

आणि

मनाला बंध घातला तर "संत" होतात" 

_____________________________________________

"प्रार्थना म्हणजे सर्वात चांगले 

वायरलेस कनेक्शन आहे"

_____________________________________________

"देवावर विश्वास असेल तर,

 देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण, 

स्वतःवर विश्वास असेल तर, 

देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल"  

_____________________________________________

"जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो"

_____________________________________________

"दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे" 

_____________________________________________

"प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ 

जाण्याची शक्ती"

_____________________________________________

"प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे, तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे" 

_____________________________________________

आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी

'रामाचा आचार',

'कृष्णाचा विचार' आणि

'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..   

_____________________________________________

जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..  

_____________________________________________

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं 

_____________________________________________

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व 

ती पेलण्यासाठी

 प्रचंड शक्ती दे ! 

_____________________________________________

"स्वार्थरहीत आणि खरीखुरी

 सेवा हीच खरी प्रार्थना"

_____________________________________________

जे का रंजले गांजले। 

त्यासी म्हणे जो आपुले।

 तोची साधू ओळखावा। 

देव तेथेची जाणावा॥  

_____________________________________________

मनाविरूध्द गोष्ट, 

म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द 

_____________________________________________

अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता

 नियमितपणे ईश्वर प्रार्थना 

केली पाहिजे. 

_____________________________________________

अन्न म्हणजे देव आहे,

 म्हणून अन्नाचा कधीही 

अपव्यय करु नका. 

_____________________________________________

अपराध करून जो सुख मिळवतो 

त्याला देव कधीही क्षमा

 करत नाही.  

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तुमच्या social media accounts वरही share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏...धन्यवाद...🙏

Post a Comment

0 Comments