मराठी कोडी व उत्तरे/ Marathi Puzzles With Answers/ Marathi Kodi With Answers

Marathi Puzzles With Answers/ मराठी कोडी व उत्तरे


Marathi Puzzles With Answers
Marathi puzzles with answers


Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी मराठी कोडी व त्याचे उत्तरे घेऊन आले आहे.


या पोस्टमधे मराठी कोडी व उत्तरे,Marathi Puzzles With Answers, Marathi Kodi With Answers इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला हे मजेशीर कोडी नक्की आवडेल.


Marathi Puzzles With Answers/ मराठी कोडी व उत्तरे


Marathi Puzzles With Answers
Marathi puzzles with answers

हिरवी पेटी काट्यात पडली,

उघडूनपाहिली तर मोत्याने भरली .

सांगा पाहू मी कोण?


:- भेंडी

_______________________________________


हजार येती हजार जाती 

हजार बसती पारावर,

अशी नारती जोराची हजार घेती ऊरावर 


.:- बस /ट्रेन

_______________________________________


सोन्याची सुरी 

भुईत पुरी,

वर पटकार गमजा करी 


:- गाजर

_______________________________________


सुपभर लाह्या त्यात एक रुपया 


:- चंद्र आणि चांदण्या

_______________________________________


सगळे गेले रानात,

अन् झिपरी पोरगी घरात 


.:- केरसुणी

_______________________________________


Marathi Puzzles With Answers
Marathi puzzles with answers

लाल आहे पण रंग नाही, 

कृष्ण आहे पण देव नाही, 

आड आहेपण पाणी नाही, 

वाणी आहे पण दुकान नाही 


:- लालकृष्ण आडवाणी

_______________________________________


मुकूट याच्या डोक्यावर,

जांभळा­ झगा अंगावर 


:- वांग

_______________________________________


बघुया कोण हुशार आहे जो कोणी उत्तर देईल ती

व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल…….

सर्वांना …. Best of luck


😂 💪🏼 हुशार कोण 💪🏼😂

एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?

ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव

दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव

तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव

व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव

सांगा पाहु ते नाव काय?


सीताराम

_______________________________________


प्रश्न असा आहे कि उत्तर काय 


:- दिशा

_______________________________________


Marathi Puzzles With Answers
Marathi puzzles with answers

पुरूष असून पर्स वापरतो,

वेडा नसून कागद फाडतो 


.:- कंडक्टर/ बस वाहक

_______________________________________


पाणी नाही, पाऊस नाही, 

तरी रान कसं हिरवं ,

कात नाही,चुना नाही, 

तरी तोंड कसं रंगल


:- पोपट

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments