केसांच्या नैसर्गिक आणि जलद वाढीसाठी करा हे घरगुती उपाय/ Fast Hair Growth Tips In Marathi

How To Stop Hair Fall In Marathi At Home/केस गळतीवर घरगुती उपाय 



How to stop hair fall in marathi


Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी केस गळतिवरील उपाय घेऊन आले आहे.


यामधे केस गळतीचे कारणे,तसेच त्यावरील उपाय आहेत.

केस गळतीपासून मुक्त कशे व्हावे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.केस विंचरताना,उशाच्या कव्हरवर आपले केस पडलेले असतात.ते बघून आपण खूप घाबरुन जातो.आपल्याला टक्कल पडण्याची लहानपणीच भिती वाटू लागते.

तुमची ही भीती दूर करण्यासाठी केस गळणे,केस पातळ होणे,आणि टकले पडणे हे आपण सुरुवातीपासूनच थांबवणे महत्वाचे आहे.जर तुम्हाला तुमचे केस मुलायम, जाड करायचे असेल तर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखली पाहिजे. केमिकल उत्पादनापासून दूर राहिले पाहिजे.केस गळती रोखण्यासाठी घरगुती उपाय केले पाहिजेत.


केस गळण्याचे कारणे 


1.प्रदूषण (pollution)

शहरांमधे खूप जास्त प्रदूषण होते. कार, ट्रेन,आणि इतर सर्व वाहतुकीमुळे वायुप्रदूषण जास्त प्रमाणात होते.याच्या संपर्कात आपण आल्यावर केसांचे नुकसान होते,केस गळायला लागतात,खराब होतात. केसांना तसेच त्वचेला यामुळे फार प्रमाणात नुकसान होते.


2.ताण (Stress) 

How to stop hair fall in marathi


आपल रोजच जीवन ताण तणावाणी भरलेले असते.कठोर परिश्रम करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.योग्य वेळेत झोप न घेणे आणि ताण घेणे यामुळे केस गळती होते.


3.पौष्टिक कमतरता (Nutritional Deficiency)

आपल्या केसांना योग्य पोषण न मिळाल्याने केस गळायला सुरुवात होते.जीवनसत्व,प्रथिने,व्हिटॅमिनपूर्ण आहार आपण घेतला पाहिजे.


4.जेनेटिक्स (Genetics)

जर तुमच्या पूर्वजांना केस गळण्याचा, टक्कल पडण्याचा इतिहास असेल तर,तुमच्या आयुष्यात असा प्रसंग येण्याची शक्यता आहे.


5.हार्मोनल बदल (Hormonal Changes) 

यौवनात प्रवेश करणे

गरोदर

गर्भनिरोधक गोळ्या घेणे

 थायरोईडची सुरुवात


6.घट्ट केसरचना (Hairsyles)

आजच्या जीवनात केसाच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स बनवणे हे नॉर्मल झाले आहे.परंतु याने आपले केस खराब होतात.ओढल्या जातात आणि केस गळती सुरू होते.


7.रोग आणि औषध (Disease And Medicine)

कर्करोग, थायरॉईड,सांधिवात,हृदयाच्या समस्या हे रोग कायम केस गळण्याचे कारण ठरू शकते. 


केस गळतीवरील घरगुती उपाय 


1.कोरफड


How to stop hair fall in marathi

केस वाढवण्याचे उपायमधे घराघरात उपलब्ध असणारे कोरफड हे केसांसाठी अतिशय उपयोगी आहे.सुंदर आणि मुलायम केसांसाठी कोरफडचा गर काढून तो केसांना तसेच केसांच्या मुळांना लावल्यास व ते 10 ते 15 मिनटात केस स्वच्छ पाण्याने धुतल्यास केसांची वाढ व्यवस्थित आणि दाट होते.केस गळतीही चांगल्या प्रमाणात कमी होते.


2.केस गळने नियंत्रित करण्यासाठी अंड्याचा मास्क


प्रथिन,सल्फर,आणि फॉस्फरसने समृध्द अंडी सतत केस गळतीवर उपचार करण्यासाठी एक विलक्षण उपाय करतात.केसांच्या वाढीत प्रोत्साहन देतात.अंड्याचा गर केसांमध्ये नियमित लावल्यास केस शानदार व मुलायमही होतात.


अंडी हेअर मास्क कसे वापरावे?


1.एक अंडे एक चमचा मध आणि थोडे खोबरे तेल.

2. पेस्ट मुळापर्यंत लावण्यासाठी ब्रशचा वापर करा.

3.25 -30 मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.


वारंवारता - आठवड्यातून एकदा 


3.नारळ स्पा 


प्रत्येक आईचे आवडते तेल म्हणजे खोबरे तेल हा एक अप्रतिम उपाय आहे.तेलातील फॅटी एसिड तुमच्या केसांची मुळे मजबूत करते.आणि केस वाढीला मदत करते.


खोबरेल तेल कसे वापरावे?


1. 2-3 चमचे खोबरेल तेल गरम करा आणि ते आपल्या टाळूला लावा.

2. टाळूला हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर राहुद्या.

3. दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.


वारंवारता- आठवड्यातून दोनदा 


4.केस गळणे थांबविण्यासाठी आवळा आणि लिंबाचा रस हेअर पॅक

How to stop hair fall in marathi

आवळा आणि लिंबू तुमचे केस मजबूत करण्यासाठी आणि केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे.व्हिटॅमिन सी सह असलेला आवळा केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो.


केसगळती नियंत्रणासाठी आवळा आणि लिंबाचा रस कसा वापरावा?


1. 1 चमचा आवळा पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा.

2. 30 मिनिटांसाठी आपल्या केसांना पेस्ट लावा.

3. केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.


वारंवारता - आठवड्यातून दोनदा 


5.केसांच्या वाढीसाठी मेथी हेअर मास्क 

How to stop hair fall in marathi

मेथी दाणे खराब झालेल्या केसांना चांगले बनवते,त्यांना पोषण देते.निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे.उच्च प्रथिन सामग्री केसांना नैसर्गिक पोषण प्रदान करते.केसांना कोंड्यापासून मुक्त करते, आणि त्यांना मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत करते.


केस गळती नियंत्रणासाठी मेथी दाणे कशे वापरावे


1. 2 चमचे मेथी दाणे व थोडे खोबरतेल रात्रभर भिजत ठेवा.

2. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पेस्टमधे बारीक करा आणि आपल्या केसांना लावा.

3. 1 तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.


वारंवारता - आठवड्यातून एकदा


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करू शकता.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील comments करुन सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments