नवरदेवासाठी मराठी उखाणे/ Best Marathi Ukhane For Boy/ Marathi Ukhane For Navrdev

 Best Marathi Ukhane For Boy/ नवरदेवासाठी मराठी उखाणे 


Best Marathi Ukhane For Navrdev
Best marathi ukhane for navrdev


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी नवरदेवाला बेस्ट मराठी उखाणे घेऊन आले आहे.


नवीन लग्न झाल्यानंतर नवरा मुलाला उखाणे घ्यायला सांगतात.म्हणजेच नवरीचे नाव पण ते उखाण्यातून तशी पद्धत मानली जाते.लग्नात जेवताना,तसेच गृहप्रवेश करताना, विविध कार्यक्रम होताना मुलाला नाव तसेच उखाणे घ्यायला सांगतात.त्यावेळी उखाणे लवकर सुचत नाही.म्हणून काही मुलं उखाणे अधिच पाठ करून ठेवतात.म्हणून मी काही स्पेशल उखाणे नवरामुलासाठी घेऊन आले आहे.मला आशा आहे तुम्हाला हे नवनवीन, मजेदार उखाणे नक्की आवडतील.


या पोस्टमधे नवरदेवासाठी मराठी उखाणे,Best Marathi Ukhane For Boy, Marathi Ukhane For Navrdev,Marathi Ukhane For Groom इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा  आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Best Marathi Ukhane For Boy/ नवरदेवासाठी मराठी उखाणे 


Best Marathi Ukhane For Navrdev
Best marathi ukhane for navrdev


काही शब्द येतात ओठातून, 

…… चं नाव येतं मात्र हृदयातून.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,

 मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


भाजीत भाजी मेथीची, 

……माझ्या प्रितीची.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


पुरणपोळीत तुप असावे साजुक, 

……. आहेत आमच्या फार नाजुक.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, 

…ची माझ्या हृदयात कोरली 

गेली एकमेव फ्रेम.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,

....मला मिळाली आहे अनुरूप.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

 ……. आहे माझी ब्युटी क्वीन.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,

 ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, 

……..झाली आज माझी गृहमंत्री.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, 

सौ……सारखी पत्नी मिळाली 

आनंद झाला मला.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,

 …….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, 

…….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

 …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,

 ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, 

………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, 

………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


एक होती चिऊ, एक होता काऊ,

 ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,

 …………. चे नाव घेतो……..च्या घरात.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,

 …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,

 ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,

 … च्या साथीने आदर्श संसार करीन.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


जगाला सुवास देत उमलली कळी,

 भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, 

 माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,  

संसार करु सुखाचा … तु, 

मी आणि एक मुल.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


लग्नाचा वाढदिवस करु साजरा,  

… तुला आणला मोग-याचा गजरा.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


कोरा कागज काळी शाई, 

 … ला रोज देवळात जाण्याची घाई.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, 

 …चे नाव घेतो सर्व जण ऐका.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


दारी होते कोनाडे त्यात होती पळी, 

 माझी … व्यवहाराच्या बाबतीत 

अगदीच खुळी.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, 

 … चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, 

 … गेली माहेरी की होतात माझे हाल.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


… माझे पिता … माझी माता,

  शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, 

 … च्या सहवासात झालो मी धुंद.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, 

 नवनांचा हार … च्या गळ्यात.

🤵😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀😘😀🤵

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही नक्की share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Read more 👇:

Best Marathi Ukhane For Girl 

Gruhpravesh Ukhane In Marathi 


या पोस्टमधे नवरदेवासाठी मराठी उखाणे आहेत.


We provide on this post Best Marathi Ukhane For Boy,Marathi Ukhane For Navrdev,etc.

If you like this post please Share with your family and friends.




Post a Comment

0 Comments